राज्यातील सर्व किनारे फीश लँडिंग केंद्रे घोषित

0
24

राज्य सरकारच्या मच्छीमारी खात्याने एका आदेशाद्वारे राज्यातील ७ जेटी, २८ रॅम्प आणि सर्व समुद्रकिनारे फीश लँडिंग सेंटर म्हणून काल अधिसूचित केले आहेत. राज्यातील चोपडा, मालीम, पणजी, कुठ्ठाळी, खारीवाडा, कुटबण आणि तळपण या ७ जेटींना यांत्रिकी मासेमारी जहाजांसाठी फिश लँडिंग केंद्र म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे. तसेच, गोव्यातील विविध भागातील २८ रॅम्प पारंपरिक मासेमारी होड्यांसाठी फिश लँडिंग केंद्र म्हणून अधिसूचित केले गेले आहेत.