राज्यातील दोघांना राष्ट्रपती पोलीस पदक

0
2

गोवा पोलीस खात्यातील दोघा पोलिसांना प्रशंसनीय सेवेबद्दल ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ प्राप्त झाले असून, त्यात पणजी वाहतूक पोलीस विभागाचे उपअधीक्षक सलीम शेख व फातोर्डा पोलीस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल सुधीर तळेकर यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अरुणाचल प्रदेशमध्ये सेवेत असलेले गोमंतकीय आयपीएस अधिकारी बॉस्को जॉर्ज यांचीही राष्ट्रपती पदकासाठी निवड झाली आहे.