राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चेसाठी विधानसभेचे अधिवेशन बोलवावे

0
212

>> सुदिन ढवळीकर यांचे राज्यपालांस साकडे

राज्य विधानसभेचे पाच दिवशीय अधिवेशन बोलवावे अशी मागणी मगो नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. कोरोनाचे संकट, म्हादई प्रश्न, खाण प्रश्न, कायदा व सुव्यवस्था आदी विषय ऐरणीवर असून सरकारने काटकसरीचा अवलंब करण्याचीही आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा अधिवेशन बोलावण्याची गरज आहे असे श्री. ढवळीकर यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

यंदा सरकारने केवळ एक दिवशीय विधानसभा अधिवेशन घेतले. त्यात अंदाजपत्रक कोणत्याही चर्चेविना संमत करण्यात आले. आक्षेप घेणार्‍या विरोधकांना सभागृहाबाहेर काढले गेले, गोवा विधानसभेच्या इतिहासात असे कधीही झाले नव्हते, असे ढवळीकर यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले आहे.