आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने सहा राज्यांमधून 9 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे नाव आहे. नितीन नबीन यांना बिहारमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय शिवेश कुमार यांनाही भाजपने बिहारमधून राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. आसाममधून तेराश गोवाला आणि जोगेन मोहन, छत्तीसगडमधून लक्ष्मी वर्मा, हरियाणातून संजय भाटिया, ओडिशातून मनमोहन सामल आणि सुजित कुमावार, पश्चिम बंगालमधून राहुल सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. 10 राज्यांमधील राज्यसभेच्या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. 5 मार्च उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

