Home बातम्या राजा परवेझ अश्रफ पाकचे नवे पंतप्रधान

राजा परवेझ अश्रफ पाकचे नवे पंतप्रधान

0

पाकिस्तानच्या सत्ताधारी पाकिस्तान पिपल्स पार्टीचे दिग्गज नेते राजा परवेझ अश्रफ यांना नवे पंतप्रधान म्हणून काल नॅशनल असेंब्लीने निवडले.

३४२ पाकिस्तान नॅशनल असेंब्लीत त्यांना २११ मते तर त्यांचे विरोधक पीएमएल-एन पक्षाचे सरदार मेहताब अहमद खान अब्बासी यांना ८९ मते मिळाली.

६१ वर्षीय अश्रफ हे भुत्तो परिवाराचे निष्ठावंत समजले जातात. युसूफ गिलानी यांना पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरविल्यानंतर सर्वप्रथम मखदूम शहाबुद्दीन यांच्या नावाची निवड झाली होती. मात्र त्यांच्यावर पकड वॉरंट असल्याचे कळल्यानंतर राजा अश्रफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

अश्रफ पाकिस्तानचे २५वे पंतप्रधान असतील. त्यांना राष्ट्रपती असिफ अली झरदारी पद व गोपनियतेची शपथ देतील.