राजस्थानात मुख्यमंत्री गेहलोत समर्थक आमदारांचे राजीनामे?

0
19

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणार आहेत. त्यामुळे गेहलोत यांना पाठिंबा देणार्‍या ९२ आमदारांनी आपले राजीनामे दिल्याचे वृत्त आहे. कॉंग्रेस आमदारांची सायंकाळी ७ वाजता होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणार आहेत. त्यामुळे ते राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता असून त्यामुळे नवीन मुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे अशोक गेहलोत समर्थक आमदार नाराज झाले आहेत.

गेहलोत कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे सचिन पायलट हे राजस्थानचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.