राजस्थानमध्ये पुढील काही महिन्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत आप इंडिया आघाडीविरोधात लढण्याची शक्यता आहे. सत्ताधारी काँग्रेसमध्ये दोन गटांत धुसफूस सुरू असून आपने 200 च्या 200 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याबाबत लवकरच निर्णय जाहीर करणार असून आम्ही 22 ऑक्टोबर रोजी बोलावलेल्या बैठकीत उमेदवारांची पहिली यादी अंतिम करून ती अरविंद केजरीवाल यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचे राजस्थानमधील आपचे प्रभारी विनय मिश्रा यांनी सांगितले.