सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी राजस्थान उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजीव प्रकाश शर्मा यांना हटवण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती मेहता यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांना याविषयी पत्र लिहिले. न्यायमूर्ती संजीव प्रकाश शर्मा त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करत आहेत. ते अनेकदा सहकारी न्यायाधीशांना बदलीची धमकी देतात. स्वतःला सरन्यायाधीशांच्या जवळचे असल्याचे सांगतात, असे मेहता यांनी पत्रात म्हटले आहे. राजस्थान उच्च न्यायालयात कायमस्वरूपी मुख्य न्यायमूर्तींची नियुक्ती करावी, असेही मेहता यांनी म्हटले आहे.

