राजन कोरगावकर यांचा शुक्रवारी मगो पक्ष प्रवेश

0
14

मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर हे शुक्रवार दि. ७ जानेवारी रोजी मगो पक्षात प्रवेश करणार असून, ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मगोचे पेडण्यातील उमेदवार असणार आहेत. स्वत: राजन कोरगावकर यांनी काल एक व्हिडिओ प्रसारित करत ही माहिती दिली.

मगोचे यापूर्वीचे पेडण्यातील उमेदवार प्रवीण आर्लेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या ठिकाणी मगोला नवा उमेदवार हवा होता. राजन कोरगावकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काल फोंडा येथे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर व आमदार सुदिन ढवळीकर यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मगो पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी पेडण्यातून मगोतर्फे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.