राजनाथ सिंह भाजप अध्यक्षपदाचे उमेदवार

0
47

६२ वर्षीय राजनाथ सिंह हे गडकरींपूवीर्र् २००९पर्यंत पक्षाध्यक्ष होते. राजनाथ हे देखील संघाचे निकटवर्तीय समजले जातात.

काल रात्री झालेल्या घडामोडींनंतर पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी पदाचा राजीनामा दिला. आपण दुसर्‍या कार्यकाळासाठी कधीच शर्यतीत नव्हतो असे ते म्हणाले.

गडकरी यांच्या निवडीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जोरदार पाठिंबा दर्शविला होता मात्र त्यांच्या कंपन्यांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणावरून त्यांना पद गमावावे लागले असल्याचे बोलले जात आहे. दुसरे म्हणजे नितीन गडकरी पक्षाध्यक्ष होत असतील तर निवडणूक लढविण्याचा इरादा यशवंत सिंह यांनीही व्यक्त केला. काही काळापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली काही नेत्यांनी गडकरींच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागितला होता.