मुलांच्या अपहरणांत दिल्लीचा क्रमांक प्रथम असून तेथे २०१० साली २९८२ अपहरणाचे प्रकार घडले आहेत. अपहरणात बिहारचा दुसरा व उत्तर प्रदेशचा तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्र ७४९ घटनांसह चौथ्या स्थानावर आहे.
भारतात २०१० साली ५ हजार ४८४ मुलांवर लैंगिक अत्याचारांची नोंद करण्यात आली आहे तर १४०८ मुलांच्या खुनाच्या घटना घडल्या आहेत असे एका सरकारी अहवालात म्हटले आहे.
देशाच्या विविध भागांतून सुमारे १० हजार मुलांचे अपहरण करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. खूनाच्या गुन्ह्यांत उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर असून तेथे ३१५ मुलांच्या खुनाची नोंद झाली आहे तर लैंगिक अत्याचारांत मध्यप्रदेश १ हजार १८२ घटनांसह पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात २११ खूनाच्या तर ७७४ लैंगिक अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली आहे. राजधानी दिल्लीत २९ मुलांचे खून झालेत तर ३०४ मुलांवर बलात्काराचे गुन्हे नोंद झाले आहेत.