रशियन्सचे टॅक्सी परवाने मागे घेण्याचा आदेश

0
60

मोरजी पंचायतीने रशियन्स नागरिकांना टॅक्सी व्यवसायाकरिता दिलेले सात परवाने मागे घेण्याचे आदेश काल पेडण्याच्या उपजिल्हाधिकारी मीना नाईक गोलतेकर यांनी दिले.

दरम्यान, आज सकाळी ९.३०पर्यंत दाखले मागे घेतले नाहीत तर दुपारी १२ वा.पासून रास्ता रोको करण्याचा इशारा टॅक्सी संघटनेने दिलेला आहे.
काल टॅक्सी व्यावसायिक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत उपजिल्हाधिकार्‍यांनी पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. श्रीमती गोलतेकर यांनी मांद्रे पंचायत सचिव रमेश मांद्रेकर तसेच गटविकास अधिकारी तुषार हळर्णकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
मोरजी पंचायतीने रशियन नागरिकांना दिलेले परवाने मागे घ्यावेत यासाठी सात दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते.