Home बातम्या योजनांबाबत चिंता नको – पर्रीकरांची ग्वाही

योजनांबाबत चिंता नको – पर्रीकरांची ग्वाही

0

कर्नाटकात खाणी बंद झाल्यानंतर गोव्यातही ते घडणार याची कल्पना होती त्यामुळे किमान ५०० कोटी रुपयांचा महसूल कमी होऊ शकेल, याचा विचार करूनच आपण अर्थसंकल्प मांडला होता. त्यामुळे खाणी बंद झाल्या तरी आपल्या सरकारच्या कोणत्याही योजनांवर त्याचा परिणाम होणार नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले.

कोणतीही परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर पर्याय असेल; त्यामुळे याबाबतीत कोणीही चिंता करू नये, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.