येत्या चार दिवसांत कॉंग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

0
9

>> प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची माहिती

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठीच्या कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या नावांची दुसरी यादी येत्या तीन ते चार दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल दिली.

भाजपला आपला पराभव डोळ्यांपुढे दिसू लागललेला आहे. आणि म्हणूनच कॉंग्रेसविषयी अफवा पसरविणे, कॉंग्रेसच्या ज्या उमेदवारांची नावे जाहीर झालेली आहेत, त्यांना बदनाम करणे, दिगंबर कामत यांच्याविषयी अफवा पसरविणे अशा गोष्टी सत्ताधारी भाजपने सुरू केल्या आहेत, असे चोडणकर म्हणाले.

कॉंग्रेसचे म्हापशातील उमेदवार सुधीर कांदोळकर हे कॉंग्रेसपासून फारकत घेणार असल्याची आणि आमदार दिगंबर कामत हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा भाजपकडून पसरवली जात आहे. त्यांच्या अफवांना आता लोकही कंटाळले असल्याचे चोडणकर म्हणाले.