यूएईहून पहिले आंतरराष्ट्रीय

0
152

विमान ‘दाबोळी’वर १ जूनला१ जूनपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होत असून या दिवशी संयुक्त अरब अमिरातहून (युएई) पहिले आंतरराष्ट्रीय विमान दाबोळी विमानतळावर उतरणार असल्याचे अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

ज्या देशांत लॉकडाऊनमुळे गोमंतकीय नागरिक अडकून पडलेले आहेत त्यांना राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वीच दर्यावर्दींसह विविध देशांत काम करणार्‍या कित्येक गोमंतकीयांना सुखरुप राज्यात परत आणण्यात गोवा सरकारला यश आलेले आहे. त्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून गोवा सरकारला चांगले सहकार्य व मदत मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मालदीव येथे अडकून पडलेल्या गोमंतकीयांविषयी त्यांना प्रश्‍न केला असता मालदीवच नव्हे. तर अन्य ज्या ज्या देशांत गोमंतकीय अडकून पडलेले आहेत त्यांना आणण्यासाठी सर्व ते प्रयत्न गोवा सरकार करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एस्‌ओपी तज्ज्ञ लोकच
ठरवतात : सावईकर
देश-विदेशांतून येणार्‍या लोकांसाठीची ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ही तज्ज्ञ लोकच ठरवत असतात. त्यामुळे त्यासाठी राजकीय नेत्यांना दोष देणे हे योग्य नसल्याचे सावईकर यानी एका प्रश्‍नावर बोलताना स्पष्ट केले.