26 C
Panjim
Tuesday, September 21, 2021

युरोपमधील सात देशांची कोव्हिशिल्डला मान्यता

>> भारताच्या इशार्‍यानंतर चोवीस तासांत राजी

युरोपमधील स्वित्झर्लंडसह ७ देशांनी भारतात उत्पादित होणार्‍या कोव्हिशिल्ड लशीला केवळ २४ तासांत मान्यता दिली. त्यामुळे भारतीयांना आता युरोपचे दरवाजे खुले झाले आहेत. ज्या सात देशांनी या लशीला मान्यता दिली त्यात स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, ग्रीस, आईसलंड, आयर्लंड आणि स्पेन या देशांचा समावेश आहे.

युरोपमध्ये फिऱण्यासाठी युरोपियन युनीयनने ग्रीन पास नावाची कल्पना अंमलात आणली आहे. ज्यांनी मान्यताप्राप्त लशींचे डोस घेतले आहेत, त्यांनाच युरोपातील एका देशातून दुसर्‍या देशात फिरण्याची मुभा आहे. आता ७ देशांनी कोव्हिशिल्ड लशीलाही मान्यता दिल्यामुळे भारतीयांचा युरोपात फिरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारताचा दणका
युरोपियन युनियनने भारताच्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींचा समावेश त्यांच्या ग्रीन पास योजनेत केला नाही. त्यामुळे भारताने नाराजी व्क्त केली. यावेळी भारताने दोन्ही लशी स्वीकारा अन्यथा युरोपियन युनियनच्या नागरिकांना भारतात आल्यावर क्वारंटाईन करून ठेवू असा थेट इशारा देण्यात आला. या इशार्‍यानंतर लगेचच वरील सात युरोपियन देशांनी कोव्हिशिल्ड लशीला मान्यता दिली.

भारताने लशींना मान्यता देण्याची रितसर मागणी केल्यानंतर एकाच दिवसात युरोपातील ७ देशांनी कोव्हिशिल्ड लशीला मान्यता दिली आहे. गुरुवारी या सात देशांनी कोव्हिशिल्ड लशीचा ग्रीन पाससाठीच्या यादीत समावेश करून घेतला. युरोपमध्ये आतापर्यंत केवळ चारच लशींना मान्यता मिळाली असून भारताची कोव्हिशिल्डही पाचवी लस आहे. यापूर्वी फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन आणि वॅक्सझेरविया या चार लशींचा समावेश होता. अर्थात कोव्हिशिल्ड आणि वॅक्सझेरविया या दोन्ही लशी ऍस्ट्राझेनका आणि ऑक्सफर्ड याच कंपनीने तयार केल्या आहेत. मात्र वेगवेगळ्या देशात त्याची वेगवेगळी नावे ठेवण्यात आली आहेत. वेगळ्या नावामुळे कोव्हिशिल्डचा समावेश आतापर्यंत करण्यात आला नव्हता.

कोव्हॅक्सिनच्याही मान्यतेची शिफारस
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना युरोपीयन युनियनने मंजुरी द्यावी, अशी मागणी भारत सरकारने बुधवारी केली आहे. कोव्हिशिल्डला याअगोदरच जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळालेली आहे, तर कोव्हॅक्सिनला मान्यता मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

युरोपातील देशांना अधिकार
युरोपियन युनियनमधील देश जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या लशींना मान्यता देऊ शकतात. त्यामुळे कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटना जेव्हा मान्यता देईल, तेव्हा युरोपीय देशांमधील मान्यतेचा मार्गही मोकळा होईल, असे सांगितले जात आहे.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

‘आयपीएल’चा तडका आजपासून आखातात

सुधाकर रामचंद्र नाईक ‘कोविड-१९’च्या मृत्युतांडवामुळे आकस्मिकपणे अनिश्‍चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आलेल्या बहुचर्चित तथा देश-विदेशांत अङ्गाट लोकप्रियता लाभलेल्या ‘इंडियन...

ताण, तणाव आणि आपण

गिरिजा मुरगोडी तुम्ही करत असलेल्या कामावर जर तुमचं प्रेम असेल आणि तुम्हाला माणसांची आवड असेल तर कुठलीच गोष्ट...

मुंगी ः एक किमयागार

अंजली आमोणकर नियमबद्धता, विचारी भाव, बदलत्या परिस्थितीशी सामना करण्याची तयारी असावी हे मुंगी शिकवते. मुंगीचं जीवन मानवासाठी मोठा...

विमा उद्योगाचे खाजगीकरण

शशांक मो. गुळगुळे अलीकडे केंद्र सरकारकडून खाजगीकरणाबाबत बर्‍याच क्रांतिकारक घोषणा करण्यात आल्या. विरोधी पक्ष त्यांचे काम म्हणून याला...

कॅप्टन पदच्युत

राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याची सध्या जी मालिका चालली आहे, त्यामध्ये भाजपने उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पायउतार केले, तर कॉंग्रेसने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन...

ALSO IN THIS SECTION

फडणवीस आजपासून गोवा दौर्‍यावर

>> निवडणूक सहप्रभारी रेड्डी व प्रभारी सी. टी. रवीही येणार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते...

गोव्याला येत्या १९ डिसेंबरपूर्वी स्वयंपूर्ण बनवणार ः मुख्यमंत्री

>> ‘सरकार आपल्या दारी’ योजनेचा शुभारंभ येत्या १९ डिसेंबरपूर्वी म्हणजेच गोवा मुक्तिदिनाच्या ६० व्या वर्धापनदिनापूर्वी गोवा स्वयंपूर्ण बनवण्याचे उद्दिष्ट...

आजपासून ५० टक्के क्षमतेने कॅसिनो, मसाज पार्लर्स सुरू

>> सरकारचा आदेश जारी कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील बंद असलेले कॅसिनो, स्पा, जलक्रीडा व जलसफरी, मसाज पार्लर्स, वॉटर पार्कस्,...

राज्यात सर्दी व तापाची साथ

>> लहान मुलांसह प्रौढांनाही बाधा राज्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असतानाच आता राज्यातील लहान मुलांसह प्रौढांमध्येही सर्दी व तापाची साथ...

माजी खासदार किरीट सोमय्या यांना मुंबईत केले स्थानबद्ध

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर दौर्‍यावर निघण्याआधीच मुंबईत मुलुंड येथील निवासस्थानी स्थानबद्ध करण्यात आले. सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हा...