युनियन स्पोर्ट्‌स क्लब माशेल विजयी

0
140

>> तिसवाडी ‘ब’ विभाग लीग

युनियन स्पोर्ट्‌स क्लब माशेलने बादे स्पोर्ट्‌स क्लबचा १० धावांनी पराभव करीत तिसवाडी ‘ब’ विभाग लीग क्रिकेट स्पर्धेत काल शानदार विजय नोंदविला. पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर हा सामना खेळविण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना युनियन स्पोर्ट्‌स क्लब माशेलने ३५.१ षट्‌कांत सर्व गडी गमावत १४५ अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात खेळताना बादे स्पोर्ट्‌स क्लबचा डाव २५.२ षट्‌कांत संपुष्टात आला.

संक्षिप्त धावफलक ः युनियन स्पोर्ट्‌स क्लब माशेल, ३५.१ षट्‌कांत सर्वबाद १४५, (प्रज्योत बुट्टिकर ४९, मोहित तारी २४ धावा. सूर्या दिवकर ४-३९, रुपेश नाईक २-२१ बळी) पराभूत वि. बादे स्पोर्ट्‌स क्लब, २५.२ षट्‌कांत सर्वबाद १३५, सरज सावळ ५१, हिमांशू सिंग १२ धावा. दीपेश नाईक ५-७, विष्णू फडते ३-२८ बळी).