यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

0
4

संपूर्ण देशाचे आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या मोसमी पावसाबाबत आनंद वार्ता भारतीय हवामान विभागाने दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सून सामान्यपेक्षा चांगला असेल. यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 105 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, हवामान विभाग 104 ते 110 टक्के पाऊस सामान्यपेक्षा चांगला मानतो. हे पिकांसाठी चांगले संकेत आहेत. प्रशांत महासागरातील एल निनो स्थिती तटस्थ आहे. संपूर्ण मोसमी पावसाच्या काळात एल निनो सक्रिय होण्याची स्थिती नाही. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा जास्त 105 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे.