तुटीचे प्रमाण 31 टक्क्यांवर; सुनियोजित पाणीपुरवठ्यासाठी आत्तापासून नियोजन करावे लागणार
केवळ 3 विभागांत पावसाचे इंचांचे शतक
यावर्षी केवळ तीन विभागांत पावसाने इंचांचे शतक ओलांडले. त्यात वाळपई, धारबांदोडा आणि सांगे या तीन विभागांचा समावेश आहे. केपे, काणकोण, साखळी, मडगाव येथे पावसाने इंचाची 80 ओलांडली आहे.
राज्यातील पावसाळी मोसमाची सांगता होण्यास केवळ एक-दोन दिवसच शिल्लक असून, या पावसाळी मोसमात आतापर्यंत एकूण 80.92 इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या सरासरी पावसाच्या तुटीचे प्रमाण 31.3 टक्के एवढे आहे. यंदाचा पाऊस राज्यातील पावसाळी मोसमातील आत्तापर्यंतचा सर्वांत कमी पाऊस ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी राज्यात 2015 मध्ये 21 टक्के एवढ्या कमी पावसाची नोंद झाली होती. तसेच, 2018 मध्ये 19 टक्के एवढ्या कमी पावसाची नोंद झाली होती. राज्यातील तुटीच्या पावसामुळे सुनियोजित पाणीपुरवठ्यासाठी आत्तापासून नियोजन करावे लागणार आहे.
राज्यात वाळपई येथे आत्तापर्यंत सर्वाधिक 111.68 इंच आणि राजधानी पणजीत आत्तापर्यंत सर्वांत कमी 54.52 इंच अशा पावसाची नोंद झाली. राज्यातील वाळपई, धारबांदोडा, केपे, सांगे, काणकोण या भागात जोरदार पावसाची नोंद झाली, तर किनारी भागातील पणजी, दाबोळी, मुरगाव, म्हापसा या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. उत्तर गोव्यात पावसाच्या तुटेीचे प्रमाण 36.5 टक्के आणि दक्षिण गोव्यात पावसाच्या तुटीचे प्रमाण 26.5 टक्के एवढे आहे.
यावर्षी पावसाळी हंगामाच्या प्रारंभाला पावसाचे प्रमाण कमी होते. 21 जून ते 7 जुलै या काळात चांगल्या पावसाची नोंद झाली. जुलै महिन्यात सुध्दा पावसाचे प्रमाण कमी होते. 16 जुलै ते 16 ऑगस्ट या काळात काही प्रमाणात चांगल्या पावसाची नोंद झाली. ऑगस्टची अखेर आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमीच होते. अखेर, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस तीन दिवस चांगल्या पावसाची नोंद झाली. ह्या तीन दिवसात पडलेल्या पावसामुळे भातशेतीला नवसंजीवनी मिळाली आहे. पावसाने दडी मारल्याने भातपीक धोक्यात आले होते.
कमी पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणांमध्ये काठोकाठ पाणी भरले आहे. पाणी वितरणाचे योग्य नियोजन न केल्यास आगामी उन्ह्यळ्यामध्ये राज्यातील काही भागांत पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण होऊ शकते.
सत्तरी तालुक्यातील अंजुणे धरण भरलेले नाही. या धरणातील पाण्याचा साठा 98 टक्के एवढा आहे. पंचवाडी धरणात 97 टक्के पाणीसाठा आहे. दरवर्षी पावसाळी हंगाम संपण्यापूर्वी या धरणे 100 टक्के भरत होती. राज्यातील दक्षिण गोव्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा 100 टक्के एवढा आहे. तिळारी धरणामध्ये 90 टक्के पाण्याचा साठा आहे. गावणे धरणामध्ये 99 टक्के आणि चापोली धरणामध्ये 75 टक्के पाण्याचा साठा आहे. आमठाणे धरणामध्ये 100 टक्के पाण्याचा साठा आहे.
राज्यातील पाऊस : वाळपई – 111.68 इंच, धारबांदोडा – 110.50 इंच, सांगे – 103.73 इंच, केपे – 96.28 इंच, काणकोण – 87.35 इंच, साखळी – 81.81 इंच, मडगाव – 80.41 इंच, फोंडा – 76.95 इंच, पेडणे – 76.36 इंच, जुने गोवे – 71.03 इंच, म्हापसा – 62.29 इंच, दाबोळी – 62.01 इंच, मुरगाव – 60.12 इंच, पणजी – 54.52 इंच,