यंदा पावसाची तूट31.7 टक्क्यांवर

0
5

राज्यात 2026 च्या पावसाळी हंगामात पावसाची सुमारे 31.7 टक्के घट नोंदवली गेली आहे. ही गेल्या 47 वर्षांतील मोसमी पावसाची सर्वांत मोठी घट आहे. या पावसाळी हंगामात एकूण 80.92 इंच पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात दरवर्षी सरासरी 118 इंच पावसाची नोंद होते. उत्तर गोव्यात पावसाची सुमारे 36.8 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे, तर दक्षिण गोव्यात सुमारे 26.9 टक्के कमी पाऊस पडला आहे. या हंगामात सप्टेंबर महिन्यात सर्वांधिक 44 टक्के पाऊस पडला आहे. पावसाळी हंगामातील चार महिन्यात कमीच पाऊस पडला आहे. जून महिन्यात 35 टक्के, जुलै महिन्यात 33 टक्के आणि ऑगस्ट महिन्यात 20 टक्के पाऊस कमी पडला आहे. 1980 ते 2026 या 47 वर्षांच्या काळात गोव्यामध्ये 2026 मध्ये पावसाची सर्वांत मोठी तूट नोंदवली गेली. 2026 च्या मान्सून हंगामात पावसाची तूट 31.7 टक्के (सुमारे 32 टक्के) इतकी नोंदवली गेली. यानंतरची मोठी तूट 2006 (29 टक्के), 1986 (23 टक्के), 2015 (21 टक्के) आणि 2018 (19 टक्के) या वर्षांत नोंदवली गेली होती.