जपानचे पंतप्रधान शिंझो अबे हे यंदाच्या गणतंत्र दिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. ते दि. २५ जानेवारी रोजी तीन दिवसांच्या भारत भेटीवर येत आहे. गणतंत्र दिन परेडला उपस्थित राहण्याबरोबरच पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी ते महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील.
दोन महिन्यांपूर्वी जपानच्या शाही दांपत्याने भारताला भेट दिली होती. भारत-जपान यांच्यात अणुकराराविषयी बोलणी अंतिम टप्प्यात आहे. शिवाय दिल्ली-मुंबई औद्योगिक महामार्ग व दिल्ली-मुंबई रेल्वे महामार्ग या प्रकल्पांना साहाय्य करण्याची तयारी जपानी संस्थांनी दाखविली आहे.