म्हार्दोळ पोलीस निरीक्षकाची चौकशी

0
11

बाणस्तारी येथील भीषण अपघात प्रकरणामध्ये म्हार्दोळ पोलीस निरीक्षक चौकशीच्या घेऱ्यात सापडले आहेत. पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
बाणस्तारी अपघात प्रकरणामध्ये ॲड अमित पालेकर आणि गणेश लमाणी यांनी पुरावे नष्ट करण्याचे स्पष्ट झालेले असताना त्यांना गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्यात न आल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाने ताशेरे ओढले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याने मोहन गावडे यांची चौकशी सुरू केली आहे. पोलीस मुख्यालयातील पोलीस अधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.