गोव्यातील सुरक्षा रक्षकांना नोकरीत कायम करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलने छेडली जात असून याचाच एक भाग म्हणून काल सकाळी ११.३० वा. म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिराकडून हुतात्मा चौकला वळसा घेऊन म्हापसा टॅक्सी स्थानकावर सुमारे ३५० सुरक्षा रक्षकांनी मोर्चा काढला. यावेळी या मोर्चाचे नेतृत्व कामगार नेते ऍड्. अजितसिंह राणे, स्वाती केरकर व विजय भिके यांनी केले. सभेनंतर सर्वांनी म्हापसा शहरात रॅली काढून सह्यांची मोहीम सुरू केली. आंदोलनकर्त्यांनी आर्थिक मदतीसाठीही लोकांकडे फंडपेटी फिरविली.

