राज्यात चोवीस तासांत 1.31 इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा येथे सर्वांधिक 4.76 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत एकूण 80.27 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात दहा दिवसानंतर पावसाचे प्रमाण वाढले आहे. मागील बरेच दिवस पावसाचे प्रमाण खूपच कमी होते. राज्यातील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा 5.3 टक्क्यांनी कमी आहे. चोवीस तासांत म्हापसा येथे जोरदार पावसाची नोंद झाली. म्हापसा येथे 4.76 इंच पावसाची नोंद झाली. केपे येथे 2.55 इंच, मुरगाव येथे 2.40 इंच, जुने गोवे येथे 1.80 इंच, सांगे येथे 0.88 इंच, दाबोळी येथे 0.92 इंच, काणकोण येथे 0.71 इंच, पेडणे येथे 0.62 इंच, पणजी येथे 0.45 इंच अशा पावसाची नोंद झाली.

