दत्तवाडी-म्हापसा येथे गुरुवारी रात्री 8 वाच्या दरम्यान चारचाकी व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात भारत हलकी हा 28 वर्षीय तरुण जागीच ठार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीचालक सेंट झेवियर कॉलेजच्या उतरणीवरुन दत्तावाडीहून म्हापसाकडे जात होता. येथील दत्त मंदिराजवळ पोहोचताच त्याठिकाणी चारचाकी वाहनचालकाने आपल्या वाहनाचे दार अचानक उघडल्याचे तेथील लोकांनी सांगितले.
यावेळी दुचाकीचालक कारच्या दाराला आपटून रस्त्यावर उसळून पडला. त्यात त्याचे डोके रस्त्यावर आपटल्याने तो रक्तबंबाळ झाला. गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. म्हापसा पोलिसांना अपघाताचा पंचनामा केला

