म्हादई खटल्यातून कदापिमाघार नाही : मुख्यमंत्री

0
10

गोवा सरकार कोणत्याही परिस्थितीत म्हादईच्या खटल्यातून माघार घेणार नसल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. म्हादईचा वाद व त्यासंबंधीचा खटला हा पूर्णपणे कायदेशीर व तांत्रिक विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. म्हादईप्रश्नी कर्नाटक राज्यात कोण काय बोलत आहे हे महत्त्वाचे नसल्याचे सांगून गोव्याचे महाधिवक्ता व विशेष कायदेशीर समिती या प्रकरणी अथकपणे काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोवा हा खटला शेवटपर्यंत लढणार असून, गोव्याला निश्चितच विजय मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पणजीत काल अनौपचारिकरित्या पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. दरम्यान, कर्नाटकने जरी म्हादईसंबंधीची याचिका मागे घेतली, तरी गोव्याने स्वत:च्या याचिका दाखल केल्या असल्याने न्यायालयीन निकाल आल्याशिवाय हा वाद संपणार नसल्याचे जलसंसाधनमंत्री सुभाष शिरोडकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.