केंद्रीय वनमंत्र्यांचा निर्णय
म्हादई अभयारण्य हे वाघ संवर्धन केंद्र म्हणून जाहीर करण्याचे केंद्रीय वनमंत्र्यांनी निश्चित केले असून यासंबंधीचा अधिकृत आदेश लवकरच जाहीर होईल, असे खात्रिलायक सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री जयंती नटराजन वाघ संवर्धन प्राधिकरणाच्या अध्यक्षा या नात्याने आपल्या शिष्टमंडळासह गोव्यात आल्या होत्या. चोर्ला घाट, सुर्ला, खोतीगांव, बोंडला, नेत्रावळी, सलीम अली या अभयारण्यांची पाहाणी करून काल केंद्रीय मंत्र्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला परतले.
सध्या राज्य सरकारने १ किलो मीटर पर्यंतचा बफर झोन असावा, असा प्रस्ताव केंद्राला सादर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय वनमंत्रालय बफर झोनचे अंतर वाढविण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास अनेक खाणी संकटात येऊ शकतात असे सूत्रांचे म्हणणे आहे.