…म्हणून दंगलग्रस्त भागांना भेट देणे टाळले ः अमित शहा

0
97

राजधानी दिल्लीत अलीकडेच झालेल्या दंगलीसंदर्भात काल लोकसभेत विरोधी नेते अधीर रंजन चौधरी यांच्या जेव्हा दिल्ली जळत होती तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय करत होते या प्रश्‍नाला शहा यांनी उत्तर दिले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आपल्या मतदारसंघात पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने तसेच आपण दंगलग्रस्त भागात गेल्यास आपल्या सुरक्षेसाठी त्या यंत्रणांवर दबाव येण्याच्या शक्यतेने आपण तेथे जाणे टाळले असे स्पष्टीकरण शहा यांनी या विषयावरील चर्चेला उत्तर देताना दिले.

मात्र विरोधकांनी अमित शहांच्या भाषणावेळी सभात्याग केला. डोनाल्ड ट्रम्प यांचे जेव्हा दिल्लीत कार्यक्रम होते त्यापैकी एकाही कार्यक्रमाला आपण उपस्थिती लावली नाही. त्या दिवशी पूर्णवेळ आपण दिल्ली पोलिसांच्या अधिकार्‍यांबरोबरच चर्चा करत होतो अशी माहिती शहा यांनी दिली.

दिल्ली जळताना मोदी पाहुणचारात मग्न ः चौधरी
त्याआधी विरोधी नेत्यांनी दिल्लीतील जातीय दंगली थोपविण्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अमित शहा यांनी राजिनामा द्यावा अशी मागणी करीत टीकेची झोड उठवली. तर सत्ताधारी भाजप सदस्यांनी हिंसाचार हे पूर्वनियोजित कारस्थान होते असा दावा केला. हिंसाचारावर नियंत्रणासाठी गृहमंत्री व प्रशासनाने योग्य कृती केल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र विरोधी नेते अधीर रंजन चौधरी यांनी हिंसाचार तीन दिवस कसा काय सुरू राहिला. याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले. दिल्ली जळत असताना पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्या पाहुणचारात मग्न होते अशी टीका त्यांनी केली.