सुमारे ५० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर म्यानमारमध्ये काल चार खासगी वृत्तपत्रे दाखल झाली. एकुण १६ दैनिकांना परवाने दिले होते मात्र केवळ चारच प्रसिद्ध होऊ शकली. २०११ साली दीर्घ हुकुमशाही राजवटीनंतर जेव्हा प्रजासत्ताक राज्य आले तेव्हा खासगी वृत्तपत्रांना मान्यतेबाबत सूतोवाच करण्यात आले होते.
त्याआधी वृत्तपत्र प्रकाशनावर शासकीय निर्बंध होते. दरम्यान, सध्याचे शासकीय दैनिक वृत्तपत्र ‘न्यू लाइट ऑफ म्यानमार’मध्येही गुंतवणुकीसाठी खासगी भागिदारांकडून प्रस्ताव मागविले आहेत.

