मोहम्मद सुहेल याला आता ईडीककडून अटक

0
9

सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) विभागीय कार्यालयाने राज्यातील जमीन हडप प्रकरणातील एक प्रमुख संशयित आरोपी मोहम्मद सुहेल याला पीएमएलए अंतर्गत अटक केली असून, त्याला विशेष न्यायालयाने चौकशीसाठी चार दिवसांची कोठडी दिली आहे. जमीन हडप प्रकरणातील मुख्य संशयित मोहम्मद सुहेल याला कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील न्यायालयीन कोठडीतून ईडीने ताब्यात घेतले.

मोहम्मद सुहेल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मालमत्ता मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. यापूर्वीच्या चौकशीनंत सुमारे 232.73 कोटी रुपयांच्या 52 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. मोहम्मद सुहेलने 100 हून अधिक मालमत्तांच्या बेकायदेशीर संपादनात आपला सहभाग असल्याचे यापूर्वीच उघड केले आहे. त्याच्या अटकेमुळे जमीन हडप प्रकरणातील रकमेचा शोध घेण्यास आणि या प्रकरणात अन्य संशयितांचे संबंध उघड करण्यास मदत होणार आहे.