मोरजी समुद्रात तामिळनाडूतील तीन युवक बुडाले

0
60
तेंबवाडा-मोरजी येथील समुद्रात आंघोळीसाठी गेलेले ३ युवक बुडून मरण पावल्याची घटना १२ रोजी सायंकाळी घडली. दोन मृतदेह सापडले. एक मृतदेह अजून सापडला नाही. दोन मृतदेह जीवरक्षकांनी पाण्यातून काढण्यात यश मिळवले.

तामिळनाडू येथील ३० ते ३५ वयोगटातील तीन युवक १२ रोजी सायंकाळी ५ वाजता तेंबवाडा मोरजी समुद्रात आंघोळीसाठी गेले होते.
बुडालेल्यांची नावे नवीन भोला (२४), श्रवणकुमार रेड्डी (२६) व गोपाळ कोटेश्वर (२४) अशी आहेत. नवीन व श्रवणकुमार यांचे मृतदेह मिळाले. गोपाळ याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही.