मोरजीत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

0
42

>> अमेरिकन नागरिकांना धमकी देऊन लुटण्याचा प्रकार

>> गुन्हे अन्वेषण व सायबर गुन्हे विभागाची कारवाई

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभाग व सायबर गुन्हे विभागाने काल एका संयुक्त कारवाईत मोरजी येथून चालवण्यात येणार्‍या एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला.

गुजरात राज्यातील काही भामट्यांनी हे बनावट कॉल सेंटर सुरू केले होते. त्यातील १० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य तिघा जणांचा शोध जारी आहे. अटक केलेल्या १० जणांना नोकरीवर ठेवण्यात आले होते.

ह्या बनावट कॉल सेंटरवाल्यांनी काही अमेरिकन नागरिकांना त्यांचा सामाजिक सुरक्षा क्रमांक ब्लॉक अथवा रद्द केला जाईल अशी धमकी देऊन त्यांना लुटण्याच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. मोरजी येथील एका तीन मजली हॉटेलमधून हे कॉल सेंटर चालवण्यात येत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून २७ संगणक, लॅपटॉप, मोबाइल व अन्य साहित्य जप्त केले आहे.