मोरजीतील अपघातात जपानी नागरिक ठार

0
49

खिंड-मोरजी येथे काल सकाळी मोटरसायकलची एका निकामी वीज खांबाला जोरदार धडक बसल्याने मोटरसायकलस्वार जपानी नागरिक बुयू ताकाशी हा जागीच ठार झाला.

गेल्या महिन्यातही ओरिसातील एका युवकाचा या वीज खांबामुळे बळी गेला होता. या खांबावर वीजवाहिन्या नाहीत. या ठिकाणी नवीन खांब घालण्यात आले असले तरी हा जुना खांब तसाच ठेवण्यात आला आहे.