मोप विमानतळ, आयुष इस्पितळाच्या एकाच दिवशी उद्घाटनाची शक्यता

0
13

>> मंत्री श्रीपाद नाईक यांची माहिती

नवीन मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ, धारगळ येथील आयुष इस्पितळ आणि झुवारी नदीवरील पुलाचा एक भाग या तिन्ही प्रकल्पांचे एकाच वेळी उद्घाटन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या तिन्ही प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी प्रयत्न सुरू असून पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाकडून उद्घाटनाच्या तारखेची वाट पाहत आहोत, असे केंद्रीय पर्यटनमंत्री मंत्री श्रीपाद नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या प्रकरणांबाबत बोलताना मंत्री श्री. नाईक यांनी, गोवा राज्यातील बरेच गुन्हे, बेकायदा गोष्टीमागे अमलीपदार्थ हेच मुख्य कारण आहे. अमलीपदार्थाच्या विरोधात कडक मोहीम सुरूच ठेवली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
गोवा सरकारने पर्यटन क्षेत्रातील अनिष्ट गोष्टींविरुद्ध मोहीम सुरू करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. केंद्र सरकारकडून गोवा सरकारला बेकायदा गोष्टीच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आवश्यक साहाय्य केले जाणार आहे. गोव्यातील पर्यटन क्षेत्रात अनिष्ट गोष्टी वाढल्याने गोव्याची देश विदेशात बदनामी होत आहे.
या कारवाईमुळे पर्यटन क्षेत्रात शिस्त येण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारकडून पर्यटन क्षेत्रातील बेकायदा गोष्टींवर कारवाईसाठी आवश्यक कायदा तयार करण्यावर विचार केला जाऊ शकतो, असेही केंद्रीय मंत्री नाईक यांनी सांगितले.