मोप विमानतळासाठी ६४ पदे निर्माण करण्याचा आदेश

0
2

राज्य सरकारच्या गृहविभागाने मोप विमानतळ पोलीस स्थानक आणि वाहतूक कक्षासाठी ६४ पदे निर्माण करण्याचा आदेश जारी केला आहे.

गृहविभागाने मोप विमानतळ पोलीस स्थानकासाठी ४३ पदे आणि वाहतूक विभागासाठी २१ कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याचे आदेश जारी केला आहे. मोप विमानतळ पोलीस स्थानकामध्ये एक पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक, ३ पोलीस साहाय्यक उपनिरीक्षक, १२ हेड कॉन्स्टेबल, २ हेड कॉन्स्टेबल (आरटीओ), २० पोलीस कॉन्स्टेबल आणि ३ पोलीस कॉन्स्टेबल चालक तसेच, मोप वाहतूक विभागासाठी एक पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक, ३ Aसाहाय्यक उपनिरीक्षक, ६ हेड कॉन्स्टेबल आणि ९ पोलीस कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे.