मोप विमानतळावरून 10 लाख प्रवाशांचा प्रवास

0
6

मोप-पेडणे येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाने पहिल्या 116 दिवसांत 10 लाख देशांतर्गत प्रवाशांना हाताळले, अशी माहिती जीएमआर गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीने काल दिली. गेल्या 5 जानेवारी 2023 रोजी या विमानतळावरून प्रवासी वाहतुकीला सुरुवात करण्यात आली. मार्च 2023 च्या देशांतर्गत वाहतूक डेटानुसार ग्रीनफील्ड विमानतळाला भारतातील टॉप-20 विमानतळांमध्ये स्थान देण्यात आले आहे. विमानतळावरून अमृतसर, भुवनेश्वर, कोईम्बतूर, गुवाहाटी, रांची, राजकोट, विशाखापट्टणम, लखनऊ, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, बंगळुरू, मुंबई, कोलकाता, पुणे, नाशिक, जयपूर, चेन्नई, नागपूर, वाराणसी, चंदीगड, पाटणा, बडोदा, डेहराडून आणि कोचीन या भागात विमान वाहतूक केली जाते.