मोप विमानतळाला तीव्र विरोध करू

0
63

भाजप-कॉंग्रेसने खाण, पर्यटन, कृषी, प्रादेशिक आराखडा या विषयांवर घेतलेले निर्णय गोव्याच्या भवितव्याला मारक असून त्यामुळे सर्व प्रश्‍नांवर गोमंतकीयांना न्याय मिळवून देण्याचे काम हा मंच करील असा दावा त्यांनी केला.

या मंचमध्ये सर्वांचा समावेश असल्याचे सांगून ३५ जणांची सुकाणू समिती सरदेसाई यांनी काल जाहीर केली. ‘गोंयकार’ मंच ही बिगर राजकीय संघटना आहे. विरोधी पक्षाची भूमिका योग्य पद्धतीने बजावली जाताना दिसत नाही. सर्व विरोधी नेते भूमिगत झाले आहेत, तर भाजप बहुमतात असल्याने या पक्षाला ‘मस्ती चढल्या’चा आरोप सरदेसाई यांनी केला.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्याला विशेष दर्जा मिळवून देण्याचे आमीष दाखवून सासष्टीतील लोकांची फसवणूक करीत असल्याची टीका त्यांनी केली. १९६७ साली जनमत कौलाच्या माध्यमातून गोव्याचे वेगळे अस्तित्व टिकविण्याचे काम गोमंतकीयांनी केले. आता ‘मोप’ प्रकल्पाच्या माध्यमातून गोवा अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

‘गोंयकार मंच’च्या सुकाणू समितीत आयरिश रॉड्रिगीस, अकबर मुल्ला, आंतोनियो सौझा, अशोक नाईक, बिशुट तिमोद, दामोदर पाळंदीकर, देवेंद्र केंकरे, दिलीप प्रभुदेसाई, दिनीज सार्दिन, दोरिस तेशेरा, एडविन बार्रेटो, फ्रान्सिस कार्दोज, हरुण शहा, इफ्तिकार शेख, जॉन मोंतेरो, मनोहर नाईक, अजय बुवा, माईक द कॉश्ता, मायकल ग्रासियस, मोहनदास लोलयेकर, मोनिका डायस, नितीन चोपडेकर, ऑस्कर मार्टिन, प्रदीप काकोडकर, प्रसाद गावकर, प्रशांत नाईक, रामू नाईक, सैफुल्ला खान, संदीप कांबळी, सेराफिन कॉता, सिद्धनाथ बुयांव, सायमन रिबेलो व वेलनेतीन बार्रेटो यांचा समावेश आहे.