संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून काल सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यानंतर चार तासांनी गृहमंत्री अमित शहा राष्ट्रपती भवनात पोहोचले. त्यांनीही राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली. मोदी व शहा यांनी एकाच दिवशी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मूर्मू यांच्यासोबत झालेल्या भेटींबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण या भेटींना महत्त्व आहे. सत्तेत असलेले दोन सर्वात महत्त्वाचे नेते राष्ट्रपतींच्या भेटीला एकाच दिवशी गेल्याने चर्चा सुरू झाली आहे.

