मोदी आडनाव बदनामीप्रकरणी राहुल गांधींना दिलासा नाही

0
4

>> याचिकेवर जूनमध्ये निर्णयाची शक्यता

मोदी आडनाव बदनामीप्रकरणी राहुल गांधींच्या पुनर्विलोकन याचिकेवर गुजरात उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून न्यायालय आता जूनमध्ये निकाल देण्याची शक्यता आहे.
यापूर्वी शुक्रवारी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी राहुल गांधी यांच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद करताना शिक्षेला स्थगिती न दिल्यास त्यांना आठ वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. अशी बाजू मांडली होती. न्यायमूर्ती हेमंत प्रच्छक यांनी, आता तक्रारदाराला त्यांची बाजू मांडू द्या. 2 मे रोजी या प्रकरण निकाली काढू. 23 मार्च रोजी सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधींना कलम 500 अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, त्यांना न्यायालयातून लगेच जामीन मिळाला. या शिक्षेला स्थगिती देण्याची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी न्यायालयात केलेली विनंती न्यायालयाने फेटाळली. यानंतर राहुल यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.