मोदींनी मतदान केंद्राबाहेर पत्रकार परिषदेला संबोधित केल्याने आणि भाजपचे चिन्ह कमळ दर्शविल्याने वाद झाला होता. त्यानंतर मोदींविरुद्ध तक्रार नोंद करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने गुजरात सरकारला दिला होता. मोदींनी लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२६ (१)(अ), आणि १२६ (१)(ब)चा भंग केल्याचे आयोगाने म्हटले होते. त्यासाठी जास्तीत जास्त दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
आयोगाच्या निर्देशानुसार एफआयआर नोंद करण्यात आल्याचे अहमदाबाद शहर पोलीस आयुक्त शिवानंद झा यांनी सांगितले.
श्रीनगरमध्ये गोळीबारात युवक ठार
जम्मू काश्मीरच्या श्रीनगर मतदारसंघात दहशतवाद्यांनी धमकी देऊनही शांततेत मतदान झाले. मात्र एकेठिकाणी मतदान आटोपल्यानंतर मतदान केंद्राच्या कर्मचार्यांवर जमावाने दगडफेक करताच सुरक्षा फौजांना गोळीबार करावा लागला. यात एक युवक ठार झाला तर दोन जखमी झाले. त्यानंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली.

