24.8 C
Panjim
Thursday, January 21, 2021

मोदींमुळे गोव्यातील विकासकामांस चालना

>> शाहनवाज हुसेन यांचे प्रतिपादन

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने विकासावर भर दिलेला असून गोव्यातही विकासकामांना चालना मिळाली आहे. गोवा विकासकामांत कुठे मागे राहू नये. तसेच गोव्याच्या समृद्ध अशा संस्कृतीचे सर्वांना दर्शन घडावे यासाठीही केंद्र सरकारचे प्रयत्न चालू आहेत, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी काल येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेता म्हणून देशाने स्वीकारले असून त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट जनता गंभीरपणे रघेत असल्याचे हुसेन म्हणाले. केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे हे शेतकर्‍यांच्या फायद्याचेच असल्याचा दावाही हुसेन यांनी यावेळी केला. शेतकर्‍यांविषयी केंद्र सरकारला सहानभूतीच असून सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांसंबंधी ज्या सूचना केलेल्या आहेत त्यावर केंद्र सरकार अभ्यास करीत असल्याचे ते म्हणाले. शेतकरी हे आमचेच असून त्यांना चर्चेसाठीचे दरवाजे सरकारने बंद केले नसल्याचे त्यांनी सांगितले.
मोदींमुळेच कोविडची लढाई देश जिंकल्याचा दावाही हुसेन यांनी केला. अन्य देशांच्या तुलनेत भारताने कोविडविरूद्ध जो यशस्वी लढा दिला तो मोदी यांच्या सक्षम नेतृत्त्वामुळेच, असा दावाही शाहनवाज हुसेन यांनी यावेळी केला.

अन्य पक्षांतून येणार्‍यांना
भाजपची दारे खुली

अन्य पक्षांतून फुटून येणार्‍या नेत्यांना भाजप प्रवेश का देत आहे असे पत्रकारांनी विचारले असता ज्या ज्या कुणाला भाजपबरोबर येऊन देशाचा विकास साधायचा आहे त्यांना भाजपात प्रवेश दिला जात असल्याचे ते म्हणाले. विकासासाठी आमच्याशी हातमिळवणी करू पाहणार्‍यांना पक्षात यापुढेही प्रवेश दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

ध्यासपंथी

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती…वाळवंटातुनी सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती --बा. भ. बोरकर जीवनभर एखादा ध्यास घेऊन वावरणार्‍या व्यक्ती...

ऐतिहासिक मालिका विजय

कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक नीचांकी धावसंख्या ते ऐतिहासिक मालिका विजय असे परस्परविरोधी क्षण टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अनुभवायला मिळाले. राखेतून फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे...

तीन-चार दिवसांत मिळेल डिस्चार्ज

>> श्रीपाद नाईक यांनी दिली माहिती देवाची कृपा आणि सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. येत्या चार-पाच दिवसात...

केंद्रीय सचिवालय उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन ः मुख्यमंत्री

केंद्र सरकारची राज्यातील सर्व कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी केंद्रीय सचिवालय उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल...

स्वातंत्र्यसैनिक व ‘मार्ग’चे प्रणेते गुरुनाथ केळेकर यांचे निधन

ज्येष्ठ गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक, कोकणी चळवळीतील एक नेते व ‘मार्ग’ ह्या रस्ता सुरक्षाविषयक चळवळीचे संस्थापक श्री. गुरुनाथ केळेकर (९१) यांचे काल पहाटे ३.३०...

ALSO IN THIS SECTION

वाहतूक नियमभंग दंडाच्या रकमेत कपात नाही ः गडकरी

केंद्रीय रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नवीन मोटर वाहन कायद्यातील वाहतूक नियमभंगासाठीच्या दंडाच्या रकमेत कोणतीही कपात न करण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे गोवा...