Home बातम्या मोदींना व्हिसा देऊ नका!

मोदींना व्हिसा देऊ नका!

0

६५ खासदारांचे ओबामांना पत्र

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा नाकारण्याचे धोरण यापुढेही अमेरिकेने चालूच ठेवावे अशी मागणी करणारी दोन पत्रे एकुण १२ पक्षांशी संबंधित ६५ खासदारांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना पाठवली आहेत.

एकुण दोन पत्रे लिहिली असून पैकी एकावर लोकसभेतील ४० खासदारांच्या तर दुसर्‍या पत्रावर राज्यसभेतील २५ खासदारांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

दरम्यान, राजनाथ सिंग सध्या अमेरिकेत असून अमेरिकी प्रशासनाने मोदींविषयी आपला पवित्रा बदलावा यासाठी ते बोलणी करणार आहेत. तसे त्यांनी न्यूयॉर्क येथे पत्रकार परिषदेत रविवारी सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर रविवारी ही पत्रे फॅक्सद्वारे पाठविली असल्याचे याकामी पुढाकार घेणारे राज्यसभेचे अपक्ष खासदार मोहम्मद अदीब यांनी सांगितले.

दरम्यान, पत्रावर सही असलेले कम्युनिस्ट पक्षाचे सिताराम येचुरी व अच्युतानंदन यांच्याशी विचारणा केल्यावर अशा कोणत्याही पत्रावर सही केली नसल्याचे त्यांनी सांगितले.