अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या बहुचर्चित सूटसाठी चक्क १.२१ कोटी रुपयांची बोली लागली. सुरतमध्ये झालेल्या लिलावामध्ये राजेश जुनेजा यांनी हा नरेंद्र दामोदरदास मोटी असे ऍम्ब्रॉयडरी केलेला सूट घेतला. या सूटसाठी मोदींनी १० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याची टीका झाली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने हा सूट प्रचाराचा मुद्दा बनविला होता. दरम्यान, हा सूट पंतप्रधानांना एका अनिवासी भारतीय चाहत्याने भेट दिल्याचे समोर आले असून लिलावातून उभी राहिलेली रक्कम गंगेच्या शुद्धीकरणासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

