नवी दिल्ली भाजपचे प्रचार प्रमुख बनल्यानंतर केलेल्या पहिल्या दौर्यात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. रालोआतील फूट व सध्याच्या राजकीय परिस्थितीवर यावेळी विचारविमर्श झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दोन्ही नेत्यांत सुमारे तासभर भेट झाली.
मोदींच्या बढतीनंतर अडवाणींनी दिलेल्या राजीनाम्यामुळे कालच्या भेटीस महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र सरसंघचालक मोहन भागवत यांच्या चर्चेनंतर त्यांनी त्यांनी राजीनामा मागे घेतला होता.
नंतर मोदी यांनी सध्या आजारी असलेले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याबरोबर वेळ व्यतीत केला. मुरली मनोहर जोशी यांचीही मोदींनी भेट घेतली व नवी जबाबदारी टाकल्याबद्दल धन्यवाद दिले.
दरम्यान, मोदी सरसंघचालक भागवत यांचीही भेट घेणार असल्याचे कळते.