काल (शनिवारी) पहाटे पोलिसांनी मयडे-चॅपलजवळ दुचाकी मोटरसायकल चोरून नेणार्या संशयितास अटक केली. याबाबत म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास रात्रपाळीवर असलेल्या पोलिसांना एका दुचाकीवरून संशयितरित्या कुणीतरी जात असल्याचा संशय आला.
त्यावेळी संशयित संतोष चव्हाण (२३) मूळ उत्तर प्रदेश येथील युवकाने मोटरसायकल तेथेच टाकून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अटक केली.
त्याने मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली.

