नुवे कार्मेल महाविद्यालयासमोर हमरस्त्यावर सकाळी ६ वाजता दोन होंडा स्प्लेंडर मोटरसायकलच्या अपघातात पाच जण जखमी झाले.
एका मोटरसायकलवर दोघे जुने गोवे येथून परतले होते तर तिघेजण जुने गोवे फेस्ताला निघाले होते. समोरासमोर टक्कर होऊन जुझे फर्नांडिस, मावेलिना फर्नांडिस, ऍल्टन फर्नांडिस, ग्लेरियो डिसोझा व सेवेरिना डिसोझा गंभीर जखमी झाले. मायणा कुडतरी पोलिसांनी जखमींना हॉस्पिसियो इस्पितळात उपचारासाठी दाखल केले आहे.

