मोकाट श्वानाचा हल्ला; कुर्टीत विद्यार्थिनी जखमी

0
12

अंत्रुजनगर-कुर्टी येथे सोमवारी सकाळी 11 वर्षीय विद्यार्थिनीवर मोकाट श्वानाने हल्ला करून जखमी केले. जखमी विद्यार्थिनीवर उपजिल्हा इस्पितळात उपचार करण्यात आले. गेल्या काही महिन्यापासून मोकाट श्वानांच्या हल्ल्याचे प्रकार वाढले असून, स्थानिक लोकांनी त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. अंत्रुजनगर येथे गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने असे प्रकार घडेत आहे. काही दिवसांपूर्वी तीन दिवसांच्या कालावधीत दोन मुलांना मोकाट श्वानांनी हल्ले करून जखमी केले होते. आता पुन्हा एकदा तशीच घटना घडल्याने स्थानिक लोक सध्या संताप व्यक्त करीत आहेत.