काल रात्री ७ च्या दरम्यान, पणजी मेरशी रस्त्यावर मिलिटरी ट्रक व ऍक्टिवा स्कूटर यांच्यात झालेल्या अपघातात ऍक्टिवा चालक फ्रान्सिस फर्नांडिस (५५) यांचा जागीच मृत्यू झाला. फ्रान्सिस हा मेरशी येथील असून तो आपल्या जीए ०२ एफ ०६२० या स्कूटरवरून पणजीहून मेरशीच्या दिशेने जात होता. यावेळी त्याच दिशेने जाणार्या मिलिटरी ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्याने तो जागीच ठार झाला. ट्रक चालक मनू के. याला पोलिसांनी अटक केली आहे.

