25 C
Panjim
Saturday, September 26, 2020

मेरशी दुहेरी खून प्रकरणी दोन्ही संशयित आरोपी दोषी

>> ३ मे रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार

मेरशी येथील दुहेरी खून प्रकरणानंतर खून करण्यात आलेल्या नायक दाम्पत्याच्या दोन मुलांचे अपहरण, लैंगिक छळ आणि खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी संशयित ओस्बान लुकस फर्नांडिस आणि रमेश बागवे यांना दोषी ठरविले आहे. पणजी येथील बाल न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निवाडा दिला असून संशयित आरोपींना ३ मे रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

नायक दाम्पत्याचा मे २०१३ मध्ये खून करण्यात आल्यानंतर त्यांच्या ६ आणि ४ वर्षांच्या दोन मुलांचे अपहरण करून त्यांचा लैंगिक छळ आणि खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या दोघा मुलांना अनमोड घाटात निर्जन स्थळी फेकण्यात आले होते. परंतु, सुदैवाने दोन्ही मुले वाचली आणि नायक दाम्पत्याच्या दुहेरी खून प्रकरणाला वाचा फुटली होती.

मेरशी येथे शिवाजी नायक हा मजूर राहत होता. कंत्राटदार ओस्बान फर्नांडिस यांच्याकडे तो कामाला होता. काही कारणास्तव शिवाजी याला खांबाला बांधून जबर मारहाण करण्यात आली. त्यात शिवाजी नायक याचा मृत्यू झाला होता. संशयित ओस्बान याने मेरशी येथे पोकलीनच्या साहाय्याने एक खड्डा खोदून तेथे शिवाजीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. मृत शिवाजी याची पत्नी सुजाता नवरा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यासाठी ओल्ड गोवा पोलीस स्टेशनवर गेली होती. त्यानंतर सुजाता हिचा मृतदेह अनमोड घाटात आढळून आला होता. या प्रकरणी संशयित ओस्बान फर्नांडिस आणि रमेश बागवे यांच्या विरोधात बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

STAY CONNECTED

844FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

प्रसिद्ध पार्श्‍वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन

प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...

२५ हजारांवर कोरोनामुक्त

>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...

पणजी परिसरात नवे २२ रुग्ण

पणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...

केंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या

>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...

संमत झालेली तिन्ही कृषी विधेयके शेतकर्‍यांच्या हिताचीच : सावईकर

२०१४ साली केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने देशातील शेतकर्‍यांच्या हितासाठी कित्येक योजना राबवल्या. हल्लीच संसदेत...

ALSO IN THIS SECTION