मेरशीत एकाच घरात 26 बोगस मतदार

0
17

सांताक्रूझ मतदारसंघातील बामणभाट-मेरशी येथे 26 मतदार बोगस असल्याची तक्रार सांताक्रुझ काँग्रेस समितीचे अध्यक्ष जॉन नाझारेथ यांनी येथील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे काल केली. एका 32 चौरस मीटरच्या घरात 28 मतदारांच्या नावांची नोंदणी आहे. त्यातील 26 मतदार बोगस आहेत, असा दावा जॉन नाझारेथ यांनी तक्रारीत केला आहे. त्यातील 15 जणांनी गत लोकसभा निवडणुकीत मतदान केले आहे. त्या घरामध्ये केवळ दोघेच राहतात. यासंबंधी तक्रार संबंधित अधिकाऱ्याकडे करण्यात आलेली आहे, असेही तक्रारीत म्हटले आहे.